Asach Prem Karshil Na | Poem | Marathi | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 10th, 2026 1 min read

Poem :

असंच प्रेम करशील ना ?

ऐक ना, शब्दात नाही सांगता येणार,
तू नजरेतून समजून घेशील ना ?
हारून बसेन जेव्हा मी सगळं,
सोबती माझ्या राहशील ना ?
ह्या वेड्या स्पंदनांना हृदयाच्या,
कायम श्वास होऊन जपशील ना ?
माहित आहे मला, तरीही तू सांग,
आयुष्यभर माझ्यावर असंच प्रेम करशील ना ?


~धनश्री पाटील.