Ashich Aste Mothi Bahin| By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2025 2 min read

Poem :

अशीचं असते मोठी बहीण

थोडीशी चिडणारी, थोडी रागावणारी, पण जीवापाड तुम्हाला जपणारी,
अशीचं असते मोठी बहीणं स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करणारी...
तुमचं नामकरण करताना, प्राण्यांच्या प्रजातीमधील एकही नाव शिल्लक न ठेवणारी,
इतर कुणी तुम्हाला साधे वेड जरी म्हटलं, तरी त्यांच्या अंगावर धावून जाणारी...
मनात असलेल्या प्रेमळ भावना व्यक्त न करणारी, तुमच्याही नकळत तुम्हाला अनेक संकटांपासून वाचवणारी....
प्रत्येकक्षणी भांडणारी, चुकलं तर लगेचं ओरडणारी, योग्य निर्णयात साथ देणारी,
आणि कायम पाठिशी उभी राहणारी...

-धनश्री संतोष.