Poem :
बोललेच नाही
मन सांगत होते कायम मला ,
थांबव त्याला क्षणभर , पण मी कधी थांबवलेच नाही.
हरवून जा त्याच्यात क्षणभर ,
पण मी कधी त्याच्यात हरवलेच नाही.
मन म्हणाले गुंतु दे ना मला ह्या सुंदर गुंत्यात क्षणभर , पण मी कधी त्याच्यात गुंतलेच नाही.
मन कायम मला समजावत राहिले पण मी कधी मनाचे एकलेच नाही,
वेळ निघून गेली आणि मला जे बोलायचे होते ते मी शेवटपर्यंत बोललेच नाही.
~धनश्री पाटील.