Poem :
चुकीचं आहे
स्त्रीच्या कौशल्याला कमी लेखणं,
तु काय करू शकतेस, म्हणून तिचा अपमान करणं,चुकीचं आहे......
तिने घातलेल्या कपड्यांवरून तिला character certificate देणं,
ती कशी आहे याविषयी मागून चर्चा करणं, चुकीचं आहे....
तिच्या मुक्त होऊन मोठ्याने हसण्याला नाव ठेवणं,
२१ व्या शतकातदेखील रात्री एकटीने फीरू नकोस असं सांगणं,
चुकीचं आहे.....
जर ती मुलाशी बोलत असेल तर ती बिघडलेय असं Statement करणं,
पण मुलाच्या प्रत्येक कृतीला पाठीशी घालणं, चुकीचं आहे......
victim असून देखील culprit आहे या नजरेने तिला पाहणं,
मुलाने Rape करुन सुद्धा चुक तुझीचं आहे असं तिला भासवणं, चुकीचं आहे.....
प्रत्येक वेळी तिने कसं वागावं याच्या Borders ठरवणं,
समाज काय करेल या Statement च्या under तिला आत्महत्तेस प्रवृत्त करणं, चुकीचं
आहे......
-धनश्री संतोष.