Corona | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2025 1 min read

Poem :

कोरोना

कुठुन कोरोनाची महामारी आली,
मोठमोठ्या रस्त्यांवरील वर्दळ गायब ही झाली...
विसरून धर्म, पंथ, जात,
एकत्र न येता देऊया कोरोनाविरुध्द लढ्यात साथं...
आता बंद आहेत ट्रेन, बस, रिक्षा,
बाहेर पडाल तर पोलिस करतील शिक्षा...
बंद झालीत विमानं,
हैराण केलय उन्हानं...
कदाचित खायला मिळेल आंबा,
पण आता घरातचं थांबा...
पाळा जमावबंदीचा कायदा,
त्यातच आहे आपला फायदा...
काही दिवसातचं भरेल नदी-नाला,
पण सध्या लॉकडाऊन सक्तीने पाळा...
अत्यावश्यक कर्मचारी स्वताचा जीव धोक्यात घालतात,
आपण मास्क तरी घालूया,
जमलचं तर घरी बसून साथं त्यांना देऊया...
एक दिवस असा नक्की येईल जो कोरोनाला ब्रम्हांडापासून दूर नेईलं,
त्याची वाट आपण पाहूया, सध्या सुरक्षित अंतर ठेवूया...

-धनश्री संतोष.