Cricket | Poem | Marathi | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 6nd, 2026 1 min read

Poem :

क्रिकेट

अहो ह्याला एक साधा खेळ म्हणून ह्याचा अपमान करू नका,
क्रिकेट तर १३८ कोटी भारतीयांचा सन्मान आहे.
अहो क्रिकेट प्रेमींना कोणी वेड म्हणू नका,
कारण दिल्लीतील असो वा गल्लीतील क्रिकेट तर प्रत्येक युवकाचा प्राण आहे.
क्रिकेट फक्त एक साधा खेळ नाही, तर क्रिकेट प्रेमापेक्षाही सुंदर भावना आहे, आठवडाभर वाट पाहत केलेली weekend ची कल्पना आहे.
अहो खेळताना batting किंवा balling नाही मिळाली तर त्याला सजा समजू नका ,
कारण क्रिकेटच्या मैदानावर fielding करण्यातही एक वेगळीच मजा आहे.
अहो क्रिकेट फक्त एक साधा खेळ नाही,
तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चढलेली एक नशा आहे.
अहो क्रिकेट तर भारताची शान आहे,
हॉकी असेल राष्ट्रीय खेळ पण क्रिकेट तर भारतीयांची जान आहे.


~धनश्री पाटील.