Poem :
होळी
होळी उत्सव विविध रंगाचा,
आनंदाचा, उत्साहाचा,
थंडीला निरोप देऊन स्वागत उन्हाचे करण्याचा...
होळी उत्सव प्रकाशाचा,
देदीप्यमान अग्नीचा,
दुर्गुणांवर मात करून, सद्गुण अंगीकारण्याचा...
होळी उत्सव भक्तीचा,
प्रल्हादाच्या विजयाचा,
आधुनिक विचारांसोबतच, आपली परंपरा जपण्याचा...
होळी उत्सव सुकलेल्या झाडांचा,
गवत व सुक्या शेणाचा,
मजा-मस्तीसोबतच समतोल निसर्गाचा राखण्याचा...
होळी उत्सव चैतन्याचा,
प्रेमाचा व एकात्मतेचा,
येणाऱ्या पिढीस कुतीतून आपली संस्कृती सांगण्याचा...
~धनश्री पाटील.