Jaga Vegale Ast Naat | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2025 1 min read

Poem :

जगावेगळं असतं नातं

जगावेगळे असत नात बाप आणि मुलीचं......
दुःखात असला किती जरी, तरी हसून स्वागत या जगात करतो त्याच्या स्वयंप्रकाशित पणतीचं ,
जगावेगळे असत नात बाप आणि मुलीचं......
मुलीमुळे, मुलीसाठी नेहमी तो हसत असतो
पण तिच्यामुळे तो कधीही रडत नाही ,
बापाला दुखात पाहून ती चिमुरडीही होते त्याची आई,
बापाला ठेच लागता दुःखात विरत काळीज त्याच्या परीचं...
एकदिवस झाडावर नवी पालवी फुटते,
ते पाहून निसर्गाच्या मनी स्मित हास्य दाटते,
तोही समाधानपूर्वक स्वागत करतो त्याच्या इवल्याश्या कळीचं....
अचानक आकाशात काळे ढग दाटतात,
ते आपल्याला पावसाचे संकेत दाखवतात,
मोठमोठे कवी सुध्दा वर्णन करतात पाऊस आणि त्याच्या सरीचं...
मुलगी मोठी होइपर्यंत तिच्या शिक्षणाचा भार बाप पेलतो,
तिच्यावर येणार संकट दोन पावल आधीच झेलतो, आयुष्यातील प्रत्येक क्षणी रक्षण करतो,
त्याच्या सुंदर अश्या बहुतीच...

-धनश्री संतोष.