Poem :
काय केले मी ?
अवघे आयुष्य माझे चरणांवर तुझ्या वाहिले मी,
गर्दीत या नजरांच्या फक्त तुलाच वळून पाहिले मी,
कधी मैत्रीण, कधी प्रियसी, कधी पत्नीपण पक्त तुझिचं होऊन राहिले मी,
आनंदाचे असो वा दुःखाचे आयुष्यातील सारे क्षण फक्त तुझ्यासोबतचं परडीत वेचले मी,
विचारतोस, तरीही तु मला घर सांभाळण्याहून आधिक तुझ्यासाठी काय केले मी?
~धनश्री पाटील.