Keenara| Poem | Marathi | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 8th, 2026 1 min read

Poem :

किनारा

अनंत अंतरापर्यंत पसरलेले सुंदर आकाश,
तुझे सौंदर्य वाढवणारा चंद्राचा प्रकाश...
मनाला छेडणारी ही मंद-मंद हवा,
सागरी किनाऱ्यावर तुझ्या स्पर्शाचा गारवा...
दूरवर पसरलेला हा सागरी किनारा,
मला घायाळ करणारा तुझ्या नेत्रांचा इशारा..
प्रिये समुद्राच्या पाण्याने झालीस तु ओलेचिंब,
हे रूप तुझे पाहुन भासते जणु चंद्रांचे प्रतिबिंब...
बसलोय दोघे विसाव्यात् माझ्या हातात आहे तुझा हात,
या क्षणी विचारीन म्हणतो, लग्न करून देशील का आयुष्यभर साथ ?
तेवढ्यात, अरे गाढवा उठना, आईची हाक आली कानावर,
स्वप्नांच्या जगातून जागा होऊन मीही आलो भानावर...


~धनश्री पाटील.