Poem :
माझी होशील का ?
थकुन येईन जेव्हा , हसून माझ्याकडे पाहशील का ?
हरून बसेन जग सारे ,तेव्हा शेजारी माझ्या बसशील का ?
प्रेमाने पाहीन तुझ्याकडे ,तेव्हा मिठीत मला घेशील का ?
एकटा पडेन जेव्हा , साथ मला देशील का ?
आनंदाच्या क्षणी,माझा हात हाती घेशील का ?
जर चंद्र झालो मी, तर तु चांदणी होशील का ?
सागर झाल्यावर मी, तु पाणी होशील का ?
सखा झालो मी, माझी साजणी होशील का?
~धनश्री पाटील.