Poem :
माझी वसुंधरा
झाडे तोडली पाखरे उडाली,
कुणीतरी आहे का हो या निसर्गाचा वाली,
पूर्वी पाटे उठता ऐकु यायचा कोकीळेचा सुर,
आज कुठेही पहा सगळीकडेच रासायनिक धुरं.
गाड्या आकाशातुन चालतिल, रस्त्यावर ट्रैफिक नसेल अशी कल्पना करताना,
अनुभवु शकते आज मी माझ्या वसुंधरेचा हिरवा शालु कायमचा हरवताना.
पैशाने भरताना बैंकातील आपआपली खाती ,
विसरलाय तो निसर्गासोबतची सगळीचं नाती.
विविध संशोधनांच्या जोरावर माणुस तंत्रज्ञान युगात आला,
पण प्रगती करताना तो माणुसकीचं विसरून गेला.
म्हणून म्हणतेय आता क्रांती फक्त बिचारात नको, तर कृतीतही दिसु दया,
शेकडो झाडे लावण्याची आश्वासने नकोत, फक्त प्रत्येकाच्या हातून एकतरी झाड लागू द्या.
~धनश्री पाटील.