Poem :
मीच का ?
अंधार दाटला काळजावरती न कळते मज आता
दिवस आहे की रात्र,
का बनवलेस रे मज देवा तु ?
विनयभंगांच्या नाटकातील मुख्य पात्र..
नवजात बालकसुद्धा डोळे बंद करते आईचे स्तनपान करताना,
का नाही रे वाटली लाज त्यांना माझा बलात्कार करताना...
उमलले ही नव्हते पूर्णपणे मी तर इवलीशी कळी होते, का नाही झाली आठवण लेकीची मला पाहुन मी तर चार
वर्षाची बाहूली होते...
माझा नक्की गुन्हा काय; का दरदिवशी माझ्या स्त्रित्वाची अशी विटंबना होते ?
आरोपी नजरेसमोर असूनदेखील शिक्षा दयायला न्यायालय एवढा वेळ का लावते ?
प्रत्येक स्त्रिची प्रार्थना आहे महाराज तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्यावा,
स्त्रिच्या अब्रुसोबत खेळणाऱ्या नराधमाचा टकमकावरून पुन्हा कडेलोट व्हावा...
~धनश्री पाटील.