Poem :
मोबाईल
अवघे विश्व एका छोट्याश्या यंत्रात सामावले,
माणसांनी मात्र जीवाभावाचे आपतेष्ठ गमावले.
मोबाईलमुळे कामे लवकर होऊन, वेळ तर वाचलां,
पण emoji पाठवता-पाठवता तो समोरा समोर हसणचं विसरला.
परदेशातील व्यक्ती आता दोन मिनिटात भेटते,
Fake Followers च्या नादात खरी मैत्री मात्र नकळत हरवते
इंटरनेटमुळे जग जवळ आले, 'Global village बनले,
जवळ असूनही माणसांचे एकमेकांवरील प्रेम मात्र कमी झाले.
म्हणून म्हणतेय आता त्या मोबाईलला थोडासां आराम देऊया.
नात्यांमध्ये प्रेमाचे रंग पुन्हा नव्याने भरूया, मोबाईल तर वापरूयाचं पण, माणुसकी ही जपूया
~धनश्री पाटील.