Poem :
पहिला पाऊस
पहिला पाऊस म्हणजे,
रिमझिम रिमझिम सुर असणारे सुंदर असे गान,
वर्षभर वाट पाहणाऱ्या चातकाचे समाधान.
पहिला पाऊस म्हणजे,
सर्वत्र दरवळणारा ओल्या मातीचा सुहास,
घराघरातून येणारा भजीचा सुंदर वास...
पहिला पाऊस म्हणजे,
भिजायला नको म्हणून घरट्याच्या दिशेने उडणारे पक्षी, निसर्गाने आकाशात रेखाटलेली ढगांची काळी-पांढरी
नक्षी...
पहिला पाऊस म्हणजे,
सळसळ करत वाहणारा बेलगाम वारा,
आनंदाने नाचताना पसरलेला मोरांचा पिसारा.
पहिला पाऊस म्हणजे,
आईची हाक, "अहो सगळी काम सोडा, कपडे भिजतील आधी ते पहा,
ओलेचिंब भिजल्यावर स्वर्गसुख म्हणजे हातातील वाफाळणारा चहा..
~धनश्री पाटील.