Pur | Poem | Marathi | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2026 1 min read

Poem :

पुर

कसा काळाने घाला घातला न कळविताच पुर घरी पाहुणा आला.
अंधाऱ्या रातीची भीती होती, मात्र पहाटेच्या सुर्यानेच दगा दिला...
पुरसोबतच घरी चिंता आणि नैराश्य देखील आले,
परताना सोबत त्यांचा कपडे, वस्तू, अन्नधान्य, सारे काही नेले,
घरातील सामान कमी पडले कदाचित! म्हणून सोबत दुकानांना ही लुटले,
काही तरी शिल्लक ठेवावं या लुटीत या विचाराने डोळ्यात पाणी तेवढे ठेवले...


~धनश्री पाटील.