Poem :
सलाम
कधीही विसरून नाही चालणार त्यांचे बलीदान,
ज्यांनी खडतर काळातही ढळु नाही दिला तिरंग्याचा' स्वाभिमान.
भारताला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी कसलाही विचार न करता फासावर ते चढले,
जन्मभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत प्राण हाती घेऊन ते लढले.
स्वातंत्र्य हा फक्त विचार नसुन भारतीयांच्या मनात धगधगणारी ती आग आहे,
भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यांचं कारण फक्त आणि फक्त त्या विरांचा त्याग आहे.
त्यांनी कुटुंबाचा विचार न करता दिली प्राणाची आहुती, त्यामुळेच स्वातंत्र्ययज्ञ सफल होऊन झाली
स्वातंत्र्यप्राप्ती.
मातृभुच्या मुक्ततेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत तो लढला, पहिला सलाम त्या वीरांना ज्यांच्यामुळे
भारंतीय स्वातंत्र्याचा इतिहास घडला...
~धनश्री पाटील.