Shaletun Collegejat Jatana| By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2025 1 min read

Poem :

शाळेतून कॉलेजात जाताना

एका डोळ्यात आश्रु, एका डोळ्यात उत्सुकता,
जसे वाटते कळीला,फुलात रूपांतर होताना ,
काही वेगळाचं असतो आनंद शाळेतुन कॉलेजात जाताना...
ओरडणारे शिक्षकं, त्या उभ्या आडव्या इमारती,
आणि आपल्या जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींना अलगतं मागे सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना...
आपण गाजवलेला रंगमंच, वाजवलेला बेंच,
चालू तासाला मारलेल्या गप्पा, आणि मधल्या सुट्टीतील डबा,
इतक्या सुंदर आठवणींच गाठोड अस कायमचं आणि घट्ट‌ बांधताना...

-धनश्री संतोष.