Yogya Asel ka ? | Poem | Marathi | By Essence Of Books

Dhanashree Patil Jan 2nd, 2026 1 min read

Poem :

योग्य असेल का ?

तुला किती ही पाहिलं तरी,
माझ्या मनाचं न भरणं.
नजरेआड होतांच तु,
मला तुझी आठवण येणं.
तुझा गुलाबी स्पर्श होताच,
माझं इतकं बावरं होणं.
माझं स्वतः ला विसरून,
तुझ्या भोवताली रेंगाळणं.
फक्त तु आणि तुच,
माझं समग्र विश्व असणं.
जसं नदीच सागरास,
तसं माझं तुझ्यात मिसळणं.
प्रत्येक क्षर्णी माझं,
तुला गमवायला घाबरणं...
योग्य असेल का माझं यालाच प्रेम म्हणणं ?


~धनश्री पाटील.